पाथरी (जि़परभणी) : चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला सुनील भिकाजी कांबळे (रा़ मफ़ुले नगर, पाथरी) हा आरोपी पोलीस ठाण्याच्या गेटवरून उडी मारून पळून गेला. ही घटना २ जानेवारी रोजी दुपारी घडली़ पोलिसांनी पाठलाग केला; परंतु, तो हाती लागला नाही़
तालुक्यातील वरखेड येथील मंदिराची दानपेटी चोरी गेल्याची घटना २३ डिसेंबर रोजी घडली होती़ या प्रकरणात पाथरी पोलिसांनी सुनील कांबळे यास १ जानेवारी रोजी अटक केली होती़ २ जानेवारी रोजी त्याला न्यायालयासमोर उभे केले जाणार होते़ त्याचवेळी आरोपीने लघुशंकेसाठी जायचे असल्याचे पोलिसांना सांगितले़ त्यामुळे त्याची हातकडी काढली होती़ आरोपीसोबत एक पोलीस कर्मचारीही स्वच्छतागृहाकडे जात होता़ मात्र त्याचवेळी आरोपीने ठाण्याच्या जुन्या गेटवरून उडी मारून पलायन केले़ पोलिसांनी पाठलाग केला मात्र तो पसार झाला़ आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोनि. डी़ डी़ शिंदे यांनी दिली़