लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून, त्याअंतर्गत २४ डिसेंबर रोजी प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे ९ शाळांना आदर्श शाळा व ५ आंतरराष्टÑीय शाळांना पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच २४६ गुणवंत विद्यार्थी आणि १६३ खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावनाताई नखाते यांनी दिली.येथील रेणुका मंगल कार्यालयात मंगळवारी दुपारी १ वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, जि.प. उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावनाताई नखाते, सभापती अशोक काकडे, श्रीनिवास मुंडे, राधाबाई सूर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रताप सवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, ओमप्रकाश यादव, एम.व्ही. करडखेलकर, डॉ.कैलास घोडके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुहास विसपुते, डाएटचे प्राचार्य अनिल गौतम, शिक्षण समिती सदस्य अजय चौधरी, प्रभाकर चापके, गंगूबाई रामलू नागेश्वर, सुषमाताई गोविंद देशमुख, पार्वती शंकरराव वाघमारे, प्रणिता रुपला राठोड, विशाखा विश्वनाथ सोळंके, उमाताई रंगनाथ वाकणकर, नारायण जाधव, राधेश्याम वाढवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.भौतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील एक जिल्हा परिषद शाळा या प्रमाणे ९ शाळा आदर्श शाळा व पाच आंतरराष्टÑीय शाळांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असून, या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक तेसच २४६ गुणवंत विद्यार्थी व १६३ खेळाडूंना प्रोत्साहन देऊन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वंदना वाव्हुळ, निरंतर शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्यासह सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे.गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम : भावनाताई नखाते४जिल्हा परिषदेच्या शाळेत बहुतांश ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे या शाळांमध्ये गुणवत्ता वाढ, आनंददायी शिक्षण, अध्यापन निष्पत्ती, क्षमता अधारित अध्यापन, माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करीत विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा, यासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.४या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील एका शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड केली असून, पाच आंतरराष्ट्रीय शाळा व गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती जि.प. उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावनाताई नखाते यांनी दिली.आदर्श पुरस्कार प्राप्त शाळा४जि.प. प्राथमिक शाळा शेंद्रा (ता.परभणी), जि.प. प्राथमिक शाळा विटा बु. (ता.पाथरी), जि.प. प्रशाला पेठशिवणी (ता.पालम), जि.प. प्रशाला एरंडेश्वर (ता.पूर्णा), जि.प. प्राथमिक शाळा धनेगाव (ता.सेलू), जि.प. प्राथमिक शाळा वझूर बु. (ता.मानवत), जि.प. प्राथमिक शाळा विटा खु. (ता.सोनपेठ), जि.प. प्रा.शाळा बोरी (ता.जिंतूर), जि.प. प्रा. शाळा खादगाव (ता.गंगाखेड).पुरस्कार प्राप्त आंतरराष्टÑीय शाळा४पाथरी तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा माळीवाडा, जि.प. प्रा.शाळा बोरगव्हाण, जि.प. प्रा.शाळा झरी, मानवत तालुक्यातील जि.प. प्रा.शाळा इरळद, जि.प. प्रा. शाळा देवलगाव अवचार.
परभणी जि.प.च्या नऊ शाळांना आदर्श शाळा पुरस्कार घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:30 AM