शहरं
Join us  
Trending Stories
1
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
2
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
3
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का
4
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
5
"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
6
गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास
7
नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'?
8
कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण
9
रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्...
10
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
11
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."
12
Prajakta Mali : "तुझ्यातला प्रामाणिकपणा, जिद्द..."; प्राजक्ता माळीने केलं सूरज चव्हाणचं झापुक झुपूक अभिनंदन
13
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
14
मॉलच्या मेन गेटमधून आतही जाऊ दिलं नाही, पायऱ्यांवर पाहावी लागली वाट; Zomato चे CEO म्हणाले...
15
"...तेव्हा मला कुणी साधं भेटायलाही तयार नव्हतं..."; Bigg Boss 18 मध्ये गेलेल्या मराठी अभिनेत्रीचा कटू अनुभव
16
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
17
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
18
Share Market Opening : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; Hero, HCL मध्ये तेजी, टायटन, अदानी पोर्ट्स घसरले
19
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
20
Adani's Big Move: अदानींनी सुरू केला भारतातील 'हा' मोठा प्रोग्राम, घरातील गॅस पुरवठ्याचं चित्र बदलणार, कसा होईल फायदा?

आरटीओ कार्यालयात वकिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:14 AM

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील एका लिपिकाने कामानिमित्त आलेल्या वकिलांना अपमानित केल्याचा आरोप करीत वकिलांनी शनिवारी दुपारच्या सुमारास आरटीओ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील एका लिपिकाने कामानिमित्त आलेल्या वकिलांना अपमानित केल्याचा आरोप करीत वकिलांनी शनिवारी दुपारच्या सुमारास आरटीओ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.अ‍ॅड. प्रमोद अंधारे हे २१ डिसेंबर रोजी अन्य एका व्यक्तीसोबत काही कामानिमित्त येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले होते. त्यावेळी तेथील लिपीक पी.एन.कºहाळे यांच्याकडे विचारणा केली तेव्हा अ‍ॅड.अंधारे यांना कºहाळे यांनी अपशब्द वापरुन अपमानित केल्याच्या कारणावरून वकिलांनी या घटनेच्या निषेधार्थ आरटीओ कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी एकही अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी आरटीओंच्या खुर्चीलाच निवेदनाची प्रत चिटकावली. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन जिल्हाधिकारी कार्यालयात जावून जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये संबंधितावर योग्य ती कार्यवाही करुन न्याय द्यावा, अशी मागणी केली. यावेळी बहुसंख्येने वकील उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीRto officeआरटीओ ऑफीसadvocateवकिल