गंगाखेड (परभणी ) : खळी, गौंडगाव, चिंचटाकळी, मैराळसांवगी ते धारासुर रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच या रस्त्याच्या दुरुस्ती कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज सकाळी ९ वाजता खळी पाटी येथे राज्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गंगाखेड परभणी राज्य रस्त्यावरील खळी, गौंडगाव, चिंचटाकळी, मैराळसांवगी ते धारासुर कडे जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीचे काम कंत्राटदाराने अत्यंत बोगस पध्दतीने केले आहे. यामुळे या कामाची चौकशी करुन कंत्राटदारावर कार्यवाही करावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज सकाळी खळी पाटी येथे दोन तास रस्ता रोको करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे केदार सोनवणे, नायब तहसीलदार यशवंतराव गजभारे, किरण नारखेडे, अव्वल कारकुन दत्तराव बिलापट्टे, मंडळ अधिकारी विक्रम गायकवाड आदींनी आंदोलनस्थळी भेट दिली. केदार सोनवणे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारून आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरेश ईखे, रमेशराव पवार, ओंकार पवार, तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, बालासाहेब सोन्नर, मधुकरराव कदम, नामदेव महाराज चिंचटाकळीकर, दादासाहेब पवार, नारायणराव मुळे, परमेश्वर पवार, बालासाहेब शिंदे, सोपानराव पुकाने, रावसाहेब बचाटे, राम ढगे, अभिजित बचाटे, गणेश बारगिरे, संतोष जाधव, युवराज सोन्नर, प्रल्हाद सुरवसे, चांगदेव सोन्नर, कल्याण लाडे, विजय सोन्नर, राम जाधव, सुभाष कदम, शाम जाधव, कैलास जाधव आदींसह बहुसंख्य विद्यार्थी, ग्रामस्थ या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.