थ्रोबॉल खेळाडूंना न्याय देण्यासाठी अजितदादांचा पुढाकार, तावडेंचाही सकारात्मक प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 03:05 PM2018-01-23T15:05:31+5:302018-01-23T15:06:06+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राजकारण, समाजकारण यासोबतच खेळालाही खूप महत्त्व देतात.

Ajitad's initiative to give justice to Throwball players, Positive Response to Pandit | थ्रोबॉल खेळाडूंना न्याय देण्यासाठी अजितदादांचा पुढाकार, तावडेंचाही सकारात्मक प्रतिसाद

थ्रोबॉल खेळाडूंना न्याय देण्यासाठी अजितदादांचा पुढाकार, तावडेंचाही सकारात्मक प्रतिसाद

googlenewsNext

परभणी - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राजकारण, समाजकारण यासोबतच खेळालाही खूप महत्त्व देतात. शेतीचे प्रश्न जेवढ्या बारकाईने त्यांनी माहीत आहेत तेवढेच बारकाईने त्यांचे खेळ व खेळाडूंच्या प्रगतीकडे असते. थ्रोबॉल खेळाडूंना वैधता प्रमाणपत्र मिळावे जेणेकरून शासकीय नोकरीतील पाच टक्के आरक्षणासाठी ते अर्ज करू शकतील, यासाठी दादांनी थेट क्रीडामंत्री विनोद तावडे यांना फोन लावला. तावडे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. जागच्या जागी फोन लावून आपला विषय थेट मंत्र्यांपर्यंत नेल्यामुळे थ्रोबॉलच्या खेळाडूंनी दादांचे आभार मानले.

हल्लाबोल यात्रेच्या सातव्या दिवशी आज अजित पवार परभणी येथे आले असताना गौरव क्रीडा मंडळ, परभणीचे थ्रोबॉल खेळाडूंचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. विषय होता, १ जुलै २०१६ रोजी शासनाने काढलेल्या एका अजब शासन निर्णयाचा (GR).
ऑलम्पिक, एशियन आणि कॉमनवेल्थ खेळाव्यतिरीक्त इतर खेळांना खेळाडूंना वैधता प्रमाणपत्र मिळणार नाही, अशी तरतूद त्यामधे आहे. वैधता प्रमाणपत्र नसेल तर खेळाडू शासकीय नोकरीमध्ये असलेले पाच टक्के आरक्षणासाठी अर्जच करु शकणार नव्हते.

आघाडी सरकारच्या काळात २००५ च्या जीआर ४२ खेळांच्या खेळाडूंना शासकीय नोकरीसाठी खेळाडू वैधता प्रमाणपत्र मिळत होते. मात्र १ जुलै २०१६ च्या जीआर नुसार ४२ पैकी फक्त २८ खेळांनाच पात्र करण्यात आले आहे.. वळलेल्या खेळांमध्ये थ्रोबॉलचाही समावेश आहे.

आज दादांना भेटलेल्या खेळांडूची अशी मागणी आहे की, शासनाचा जीआरचे आम्ही स्वागतच करतो. मात्र जे खेळाडू २०१६ पूर्वीपासून १० ते १५ वर्षांपासून एकच खेळ खेळत आहे, त्यांच्यावर हा अन्याय आहे. त्यामुळे २०१६ पूर्वीपासून जिल्हा व राज्य स्तरावर जे खेळाडू खेळत आहे, त्यांना खेळाडू वैधता प्रमाणपत्र द्यावे. जेणेकरून शासकीय नोकरीसाठी त्यांना अर्ज करता येईल. दादांनी तात्काळ क्रीडामंत्री विनोद तावडे यांना फोन करुन याबद्दल माहिती दिली. तावडे यांनाही दादांना सकारात्मक प्रतिसाद देत या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Ajitad's initiative to give justice to Throwball players, Positive Response to Pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.