दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून रोख रक्कम दिली जात होती. परंतु यावर्षी कोरोनामुळे भाऊबीज रकमेची घोषणा करण्यास शासनस्तरावर विलंब झाला. त्यामुळे या भाऊबीज रकमेचा लाभ दिवाळीच्या कालावधीत या कर्मचाऱ्यांना झाला नाही. कोरोनामुळे अंगणवाड्या बंद असल्या तरी कोरोना उपाययोजना व माझे कुटुंब माझी जबाबदारी यामध्ये अंगणवाडी कर्मचारी यांनी गावपातळीवर रात्रंदिवस घरोघरी जाऊन आपले कर्तव्य बजावले आहे. सेलू तालुक्यातील १५१ अंगणवाडी कार्यकर्ती व १३९ मदतनीस अशा २९० कर्मचाऱ्यांच्या बँक खाती प्रत्येकी २ हजार रूपये जमा करण्याची कार्यवाही महिला व एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी एस.बी. कच्छवे यांनी मागील दोन दिवसात तातडीने पूर्ण केली आहे.
अंगणवाडी सेविकांना साडेपाच लाख भाऊबीज रक्कम वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:43 AM