लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर अनिता रविंद्र सोनकांबळे आणि उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी २३ डिसेंबर रोजी मनपा सभागृहात आ़सुरेश वरपूडकर व माजी आ़ सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला़महापौर अनिता सोनकांबळे व उपमहापौर भगवान वाघमारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला़ नवीन पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शहरवासियांना येत्या दोन महिन्यात पाणीपुरवठा सुरू केला जाईल़ त्याच प्रमाणे आरोग्य, स्वच्छता, रस्ते आदी मुलभूत सुविधांची कामे प्राधान्याने केली जातील़ रस्त्यांच्या कामांसाठी कार्यारंभ आदेश दिले असून, ही कामेही युद्ध पातळीवर पूर्ण करून घेतली जातील, अशी ग्वाही महापौर अनिता सोनकांबळे व उपमहापौर भगवान वाघमारे यांनी यावेळी दिली़ तसेच महापालिकेंतर्गत कार्यकारी अभियंता, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, लेखाधिकारी, मुख्यलेखाधिकारी ही रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल़ आॅनलाईन घरपट्टी, नळपट्टी भरण्याची सुविधाही त्वरित पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले़ याप्रसंगी माजी महापौर मीनाताई वरपूडकर, माजी उपमहापौर माजू लाला, रविराज देशमुख, सभापती समशेर वरपूडकर, जलालोद्दीन काजी, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, पंजाब देशमुख, नदीम इनामदार, नगरसेवक जानमोहम्मद जानू, सभापती सचिन देशमुख, विशाल बुधवंत, बंडू पाचलिंग, दिनेश परसावत, रविंद्र सोनकांबळे, पाशा कुरेशी, फारुख बाबा, विनोद कदम, नागेश सोनपसारे, अमोल पाथरीकर, गणेश देशमख आदींसह काँग्रेस कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते़
अनिता सोनकांबळे यांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:30 AM