परभणी : महापालिकेतील विविध विभागांचा कारभार सोयीचा व्हावा, यासाठी ७ विषय समित्यांची घोषणा महापौर मीना वरपूडकर यांनी केली आहे. सत्ताधारी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेच्या नगरसेवकांची या समित्यांवर निवड करण्यात आली आहे.
महानगरपालिकेचा कारभार नवीन पदाधिका-यांनी हाती घेतल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी विषय समित्यांची निवड करण्यात आली आहे़ त्यामुळे आता या समित्यांमार्फत त्या त्या विभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास गती मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर केलेल्या समित्या व त्यांचे सदस्य असे :
महिला व बालकल्याण समिती : जयश्री खोबे, खान मुन्सीफ नय्यर विखार, सय्यद समरीन बेगम फारुक, वैशाली विनोद कदम (सर्व काँग्रेस), चाँद सुभाना जाकेर खान, नाजेमा बेगम शेख अ. रहीम, शेख अलिया अंजूम मोहम्मद गौस (सर्व राष्टÑवादी), विजयसिंग ठाकूर (शिवसेना), रंजना सांगळे, उषाताई झांबड (भाजप).
शहर सुधार समिती : खमिसा जान मोहम्मद हुसेन, शेख अकबरी साबेरमुल्ला, मो. नईम मो. यासिन, सबिबा बेगम हसन बाजहाव (सर्व काँग्रेस), शेख फहेद शेख हमीद, नाजेमा बेगम शेख अब्दुल रहीम, चाँद सुभाना जाकेर खान (राष्टÑवादी काँग्रेस), अतूल सरोेदे (शिवसेना), नंदकिशोर दरक, संतोषी सुनील देशमुख (भाजप),
गलिच्छ वस्ती निर्मूलन घर बांधणी व समाज कल्याण समिती : अनिता रवींद्र सोनकांबळे, नागेश सोनपसारे, तांबोळी जाहेदा परवीन अ. हमीद, वैशाली कदम (काँग्रेस), अमोल पाथरीकर, डॉ.वर्षा खिल्लारे, नम्रता हिवाळे (राष्टÑवादी काँग्रेस), सुशील मानखेडकर, अमरदीप रोडे (शिवसेना), मंगल मुद्गलकर, संतोषी सुनील देशमुख (भाजप),
स्थापत्य समिती : राधिका गोमचाळे, मोहमदी बेगम अहमद खान, माधुरी बुधवंत, कमलाबाई काकडे (काँग्रेस), शेख समिना बेगम अहमद, संगीता दुधगावकर, अली खान मोईन खान (राष्टÑवादी काँग्रेस), चंद्रकांत शिंदे (शिवसेना), अशोक डहाळे, मंगल मुद्गलकर (भाजप),
वैद्यकीय व सहाय्य आरोग्य समिती : गुलमीर खाँ कलदंर खाँ, सीमा नागरे, अनिता सोनकांबळे, सचिन देशमुख (काँग्रेस), डॉ.वर्षा खिल्लारे, शेख समिना बेगम अहमद, संगीता दुधगावकर (राकाँ), प्रशास ठाकूर (शिवसेना), उषा झांबड, डॉ.विद्या प्रफुल्ल पाटील (भाजप),
विधी समिती व महसूल वाढ समिती : सचिन अंबिलवादे, खमिसा जान मोहम्मद हुसेन, शेख फरहत सुलताना शेख अ. मुजाहेद, सचिन देशमुख (काँग्रेस), अमोल पाथरीकर, अली खान मोईन खान (राकाँ), प्रशास ठाकूर (शिवसेना), नंदकुमार दरक, डॉ.विद्या प्रफुल्ल पाटील (भाजप),
माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक समिती : पठाण नाजनीन शकील माहीयोद्दीन, सुनील देशमुख, अब्दुल कलीम अ. समद, वनमाला देशमुख (काँग्रेस), बालासाहेब बुलबुले, आबेदाबी सय्यद अहमद, शेख फहेद शेख हमीद (राकाँ), अमरदीप रोडे (शिवसेना), रंजना सांगळे, अशोक डहाळे (भाजप).