परभणी: शहरातील मिलिंद नगर व पाथरी तालुक्यातील रामपुरी येथे प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून आता जिल्ह्यात एकूण कोरोनाबधित रुग्णाची संख्या 88 झाली आहे.
परभणी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांत 30 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने व गेल्या दोन दिवसांत एकही कोरोनाबधित रुग्ण आढळला नसल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला होता; परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. गुरुवारी सकाळी जिल्हा प्रशासनास नांदेड येथील प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालानुसार परभणी शहरातील मिलिंद नगर व पाथरी तालुक्यातील रामपुरी येथे प्रत्येकी एक कोरोनाबधित व्यक्ती आढळून आला आहे.
हे दोन्ही रुग्ण आयसोलेशन वार्डात यापूर्वीच दाखल आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण कोरोनाबधित रुग्णाची संख्या 88 झाली आहे. त्यात दोघांचा मृत्यू झाला असून 31 जण कोरोनामुक्त झाले आहेत.