पूर्णा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक होत आहे. पोलीस प्रशासन याविरुद्ध वेळोवेळी कारवाई करीत असले तरी वाळू तस्करीला लगाम लागत नसल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी पहाटे पूर्णा तालुक्यातील लक्ष्मीनगर येथून वाळू घेऊन एक टिप्पर जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आहेरवाडी पाटी येथे पोलिसांनी हा टिप्पर पकडला आहे. टिप्परसह त्यातील तीन ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून, या प्रकरणात टिप्पर चालक, मालक आणि वाळू वाहतूक करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक बापुराव दडस, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, राहुल चिंचाणे, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, फारूकी, अझहर पटेल, विष्णू भिसे, दीपक मुदीराज, कांबळे आदींनी केली.
पूर्णा तालुक्यात आणखी एक टिप्पर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:18 AM