परभणी : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीटच्या परीक्षेची चॅलेंज आन्सर की गुरुवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली असून, त्यामध्ये जीवशास्त्र विषयातील दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची दर्शविल्याची माहिती या विषयाचे तज्ज्ञ डॉ़ मारोती हुलसुरे यांनी दिली़
जीवशास्त्र विषयाच्या चॅलेंज आन्सर की मध्ये प्रश्न क्रमांक १- कन्सीडर द फॉलिंग स्टेटमेंट मध्ये ए) कोईंझाईम ऑर मेटल आयन दॅट इज टाईटली बाऊंड टू एनझाईम प्रोटीन इज कॉल्ड प्रोस्थेटीक ग्रुप़ ब) अ कम्प्लीट कॅटालाईटीक अॅक्टिव्ह एनझाईम वुईथ इट्स बाऊंड प्रोस्थेटीक ग्रुप इज कॉल्ड अपोएनझाईम हे स्टेटमेंट दिले असून, त्यात पर्याय १) ए इज ट्रू बट बी इज फॉल्स़ २) बोथ ए अँड बी आर फॉल्स ३) ए इज फॉल्स बट बी इज ट्रू ४) बोथ ए अँड बी आर ट्रू हे चार पर्याय उत्तरादाखल दिले आहेत़ त्यात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पर्याय क्रमांक १ हे उत्तरादाखल दिले आहे़ प्रत्यक्षात एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमानुसार पर्याय क्रमांक २ हे उत्तर बरोबर आहे़ अशीच गफलत आणखी एका प्रश्नात केली आहे़ वुईच ऑफ द फॉलविंग स्टेटमेंट इज करेक्ट १) कॉर्निया कन्सीट ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ इलॅस्टिन अँड कॅन रिपेअर इटसेल्फ़ २) कॉर्निया इज ए ट्रान्सपरंट लेअर वुईच इज हायली व्हॅस्कुलाराईज ३) कॉर्निया कन्स्टीट ऑफ डेन्स मॅट्रीक्स ऑफ कोलॅजन अँड इज मोस्ट सेन्सीटीव्ह पोर्सेशन ऑफ द आय ४) कॉर्निया इज अॅॅन एक्सटरनल, ट्रान्सपरंट अँड प्रोटेक्टीव्ह प्रोटीनॅसीयस कव्हरिंग ऑफ द आयबॉल़ यात एनटीएने दिलेले उत्तर पर्याय क्रमांक ३ आहे़ पण एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमानुसार पर्याय क्रमांक ४ हे उत्तर आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर या दोन प्रश्नांसंदर्भात ३१ मे रोजी रात्री ११़५० वाजेपर्यंत आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन हुलसुरे यांनी केले आहे़