राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत मिश्रक या पदापासून सुरुवात करीत तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील मुख्य औषध निर्माण अधिकारी या पदावरून पेडगावकर सेवानिवृत्त झाले.
पेडगावकर यांनी प्रशासनामध्ये ही आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. औषध निर्माण अधिकाऱ्याचे पद तसे तांत्रिक संवर्गातील. या पदावरील व्यक्तीला संधी मिळाल्यास ती किती चांगले काम करू शकते, हे पेडगावकर यांनी प्रशासकीय अधिकारी पदावरून दाखवून दिले, असे गौरवोद्गार त्यांच्या सत्कारप्रसंगी अधिकाऱ्यांनी काढले. याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव, ह.भ.प. बाळासाहेब मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, आरोग्य सेवेेचे माजी उपसंचालक डॉ. पी. एल. भरती, माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुहास विसपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. पी. देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश खंदारे, आर.सी.एच. अधिकारी डॉ. सिरसुलवार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. व्ही. आर. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, डॉ. राजेंद्र चाटे, जिल्हा परिषदेचे औषध निर्माण अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष अविनाश देशमुख, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कापसे, कृष्णा साळवे, कैलास सोमवंशी, कास्ट्राइब संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश गायकवाड आदींची उपस्थिती होती.