आयटक प्रणित आरोग्य विभाग आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने हे आंदोलन केले जात आहे. आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना एकूण ७२ प्रकारची कामे करावी लागतात. या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करून सर्व लाभ द्यावेत, अशी संघटनेची मागणी आहे. तसेच कोरोना काळातील कामाचा प्रति दिन ५०० मोबदला द्यावा, शेष फंडातून प्रोत्साहनपर १ हजार रुपये द्यावेत, या मागण्या मान्य न झाल्याने १५ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. आशा प्रवर्तक व गटप्रवर्तक यांनी हा संप यशस्वी करावा, असे आवाहन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुगाची बुरुड, आशा तिडके, बाबाराव आवरगंड, संजीवनी स्वामी, वंदना हाके, संगीता काळबांडे, वंदना हिवराळे, सुनीता कुरवाडे, आसमा खान, सुधाकर वाढवे, वैशाली गरड, पांडुरंग कस्तुरे, मुक्ताबाई शिंदे आदींनी केले आहे.
जिल्ह्यातील आशा वर्कर बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:24 AM