परभणी : नवरदेव असलेल्या इस्रोच्या वैज्ञानिकावर हळदीला जाताना झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. या घटनेत नवरीच्या प्रियकराने त्याच्या मित्राच्या मदतीने हा कट रचल्याची कबूली ताब्यात घेतलेल्या इसमाने दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी हा प्रेमाचा जांगडगुत्ता अवघ्या एका दिवसात उलगडीस आणला आहे. यात प्रेमीयुगलास ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी दिली.
नवरदेव असलेल्या इस्रोच्या वैज्ञानिकावर हळदीला जात असताना परभणी-वसमत महामार्गावर राहाटी नदी पुलाजवळ चार अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला होता. सोमवारी सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. याप्रकरणी आधी पूर्णा ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अज्ञात कारणाने हल्ल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी मंगळवारी रात्री प्राथमिक चौकशी अंती बुधवारी राजू डिघोळे (२८ रा.परभणी) यास ताब्यात घेतले. तसेच नवरी मुलीला सुध्दा चौकशीला बोलावून ताब्यात घेतले. हा प्रकार नवरी मुलीने राजू डिघोळे याच्या मित्राच्या मदतीने केल्याचे सांगितले.
चार जणांच्या शोधासाठी पथके रवानाघटनेत हल्ला करणारे चार जण फरार असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. यात स्थानिक गुन्हा शाखा व अन्य पूर्णा पोलिसांचे पथक शोधासाठी रवाना झाले आहेत. मात्र, आरोपी हे गायब झाले आहेत.
नवरीला घेतले ताब्यातराजू डिघोळे नावाच्या २८ वर्षीय मुलास ताब्यात घेतले आहे. नवरी मुलीने याच्या माध्यमातून अन्य चार जणांकडून हा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीला सूध्दा ताब्यात घेतले आहे. राजू डिघोळे यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. - रागसुधा.आर. पोलिस अधीक्षक, परभणी.