लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : वन विभागाच्या अधिकाºयांनी पिंपळगाव बाळापूर येथे २ मार्च रोजी भेट दिली असून शेळ्यांच्या पिलावर हल्ला करणारा बिबट्या नसून तरस हा प्राणी असल्याचे स्पष्टीकरण केल्याने गावकºयांचा जीव भांड्यात पडला आहे.पिंपळगाव बाळापूर येथील रामकिशन बनसोडे यांच्या शेतातील आखाड्यावर १ मार्च रोजी रात्री एका अज्ञात हिंस्त्र पशूने शेळीच्या पिलांवर हल्ला केला होता. यात एक पिलू दगावले होते. आखाड्यावरील शेतकºयांनी या हिंस्त्र पशूस हुकावून लावले. शुक्रवारी वन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी बोकारे, पशू वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाºयांनी भेट दिली. मयत व जखमी शेळीच्या पिलावरील हल्लाच्या व्रणांची अधिकाºयांनी पाहणी केली. त्यानंतर हल्ला करणारा हा प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचा अंदाज वन अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. सहा महिन्यांपूर्वीही या प्राण्याने हल्ला केला होता. त्यावेळी वन विभागाच्या पथकाने १५ दिवस सापळा लावूनही हल्ला करणारा प्राणी सापडला नव्हता.
हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून तरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:29 AM