परभणी : पालम तालुक्यातील राहटीत हैदराबाद कुळ कायद्याबाबतचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदाद्वारे करण्यात आली होती. यात आमच्यावर अन्याय झाला म्हणून दोघांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. यादरम्यान दुपारी गोंधळ उडाल्याने अधिकारी, कर्मचारी हैराण झाले होते. या घटनेदरम्यान कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी संबंधितांना रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
राहट गट क्रमांक १३/२/ब/अ/ मध्ये पाच एकर ११ गुंठे जमिनीबाबत कुळाचा दावा कनिष्ठ न्यायालय पालम यांनी नामंजूर केला आहे. यासह तहसीलदारांनी सुद्धा कुळ कायदा जमिनीची नोंद कुठेही आढळून येत नसल्याचा आदेश दिला आहे. याबाबत चुकीचा निर्णय असल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असल्याची तक्रार संजय रोहिदास गायकवाड, चंद्रकांत भगावान गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली हाेती. २३ नोव्हेंबरला दिलेल्या तक्रारीत जर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर २८ नोव्हेंबरला कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच अंगावर डिझेल टाकून स्वत: पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांसह, कर्मचऱ्यांनी त्यांना थांबल्याने पुढील अनर्थ टळला. काही वेळानंतर पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांना ताब्यात घेत ठाण्यात घेऊन गेले.
संबंधित प्रकरण काय आहे, यासंबंधी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी संबंधितांना आपल्या दालनात बोलावून त्यांची बाजू समजून घेतली. यासह आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर सुद्धा महसूल आणि पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे अपेक्षित होते. मात्र, दोन्ही यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे पुढे आले.न्याय मिळत नसल्याने आत्मदहनाचा प्रयत्नपरभणी : पालम तालुक्यातील राहटीत हैदराबाद कुळ कायद्याबाबतचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदाद्वारे करण्यात आली होती. यात आमच्यावर अन्याय झाला म्हणून दोघांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. यादरम्यान दुपारी गोंधळ उडाल्याने अधिकारी, कर्मचारी हैराण झाले होते. या घटनेदरम्यान कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी संबंधितांना रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
राहट गट क्रमांक १३/२/ब/अ/ मध्ये पाच एकर ११ गुंठे जमिनीबाबत कुळाचा दावा कनिष्ठ न्यायालय पालम यांनी नामंजूर केला आहे. यासह तहसीलदारांनी सुद्धा कुळ कायदा जमिनीची नोंद कुठेही आढळून येत नसल्याचा आदेश दिला आहे. याबाबत चुकीचा निर्णय असल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असल्याची तक्रार संजय रोहिदास गायकवाड, चंद्रकांत भगावान गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली हाेती. २३ नोव्हेंबरला दिलेल्या तक्रारीत जर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर २८ नोव्हेंबरला कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी संबंधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच अंगावर डिझेल टाकून स्वत: पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांसह, कर्मचऱ्यांनी त्यांना थांबल्याने पुढील अनर्थ टळला. काही वेळानंतर पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांना ताब्यात घेत ठाण्यात घेऊन गेले.
संबंधित प्रकरण काय आहे, यासंबंधी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी संबंधितांना आपल्या दालनात बोलावून त्यांची बाजू समजून घेतली. यासह आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर सुद्धा महसूल आणि पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे अपेक्षित होते. मात्र, दोन्ही यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे पुढे आले.