परभणी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर जिल्ह्याने पावसाच्या सरासरीची शंभरी गाठली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यावर्षी मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी अनेक भागात पेरणी सुरू केली आहे. १ जूनपासून ते आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १०३ मिमी पाऊस झाला. पाथरी तालुक्यामध्ये सर्वाधिक १५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परभणी तालुक्यात १११, पालम १०१ आणि मानवत तालुक्यात १२५ मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे. पूर्ण तालुक्यात ९७, गंगाखेड ९२, जिंतूर ७९.८९ आणि सोनपेठ तालुक्यात ७१ मिमी पाऊस झाला आहे. पाथरी मंडळात अतिवृष्टीपाथरी तालुक्यातील पाथरी मंडळांमध्ये सोमवारी रात्री अतिवृष्टीची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे. या मंडळात २४ तासांमध्ये ८२ मिमी पाऊस झाला आहे. तर या तालुक्यात ४५.६७ मिमी पाऊस झाला. परभणी तालुक्यात २८.१३, पालम ११.६७, पूर्णा २६.६०, गंगाखेड ६.२५, सोनपेठ ११, सेलू २.२०, जिंतूर ३.६७ आणि मानवत तालुक्यात २५.६७ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी १७.८७ मिमी पाऊस झाला आहे.