या रस्त्यावर साडेगावफाट्या जवळ नवीन पूलाचे बांधकाम झाले आहे. परंतु, पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता समतल करण्याचे काम करण्यात आले नाही.यामुळे रस्त्यावर बरेच उंचवटे तसेच राहिले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हा रस्ता वर्षभरानंतरही हॉटमिक्स डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे.खड्य्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. परिसरातील ग्रामस्थांना परभणी ,जिंतूर, औंढाशी जोडणारा हा एकमेव आंतरजिल्हा रस्ता आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन सा.बां.विभागाने आसेगाव ते झरी रस्त्याचे त्वरित हॉटमिक्स डांबरीकरण करुन ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
आसेगाव ते झरी रस्त्याची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 4:33 AM