शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

परभणी जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे २ हजार कोटींचा व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 3:47 PM

आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़ 

परभणी - आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़ 

परभणी जिल्ह्यात १० राष्ट्रीयकृत बँका असून, या बँकांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी ३० मे रोजी संप पुकारला़ सकाळी  १० वाजेच्या सुमारास सवृ अधिकारी, कर्मचारी दाखल झाले़ परंतु, या कर्मचाऱ्यांनी कामकाज न करता स्टेट बँक आॅफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर निदर्शने केली़ यावेळी इंडियन बँक असोसिएशन व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या़ युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनमध्ये समाविष्ट असलेल्या ९ संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते़ मुख्य प्रतिनिधींनी बँक कर्मचाऱ्यांची सध्याची परिस्थिती व इतर बाबींवर मार्गदर्शन केले़ 

डॉ़ सुनील टाके, डॉ़ सुनील हट्टेकर, भास्कर विभुते, अशोक पिल्लेवार, सौरभ देगावकर, प्रशांत जोशी, रणजीत काकडे, बालासाहेब साठे, प्रणयकुमार विश्वास, चंद्रकांत लोखंडे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले़ परभणी जिल्ह्यातील १९ बँकांमधील सुमारे ८०० कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे़ 

टॅग्स :bankबँकStrikeसंपSBIएसबीआय