जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दरमहा तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल महिन्यात तपासलेल्या ३ हजार ८७८ नमुन्यांपैकी सहा नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना राज्य शासन राबवित आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील दूषित निघालेल्या सहा गावांतील पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर आजार फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याने ग्रामपंचायतीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना दिले आहेत.
पाणी नमुने सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह
जिल्हा आरोग्य विभागाकडून दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जातात. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ७०४ गावांतील ३ हजार ८७८ पाणी नमुने एप्रिल महिन्यात तपासण्यात आल्याचे पाणी नमुने सर्वेक्षण विभागाने सांगितले.
दुसरीकडे पाथरी तालुक्यात जून महिन्यात तपासणी करण्यात आलेल्या ५९ पाणी नमुन्यांपैकी ४ गावांतील पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. तर वर्षभरात एकूण ३३६ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३६ पाणी नमुने दूषित आढळून आले तर जिल्हा आरोग्य विभागाच्या एप्रिल महिन्याच्या अहवालात ४३८ नमुने तपासण्यात आले. त्यातील एकही दूषित आढळून आला नसल्याने या पाणी नमुने सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
कोरोनामळे नमुने घेण्यास अडचण
n जिल्हा आरोग्य विभागाकडून दर महिन्याला ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील पाणी नमुने तपासले जातात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावातील पाणी नमुदे तपासण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला.
n त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने एप्रिल २०२१ मध्ये पाणी नमुने सर्वेक्षण करण्यात आले.
n त्यामध्ये ३ हजार ८७८ नमुन्यांपैकी केवळ सहा नमुने दूषित आढळून आले.
आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या!
n ग्रामीण भागात बहुतांश पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहिरी या नदी, ओढ्यांच्या काठी आहेत. त्यामुळे या नदी व ओढ्यांना पूर आल्यानंतर पुराचे पाणी या विहिरींमध्ये जाते.
n ग्रामीण भागात खाजगी विहिरी, बोअर या जलस्रोतांजवळ मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचते.
n बहुतांश जलस्रोतांजवळून गावातील नाल्या वाहतात. त्यामुळे ग्रामस्थांनी पाणी पिताना ते पाणी उकळून पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पूर्णा तालुका अग्रेसर
n जिल्हा आरोग्य विभागाकडून पाणी नमुने सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पूर्णा तालुक्यातील ६२५ नमुन्यांची तपासणी केली.
n त्यामध्ये ५ नमुने दूषित आढळून आले. जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात सर्वाधिक नमुने दूषित आढळले.