सध्या सोशल माध्यमावर प्रत्येक जण माहितीची देवाण-घेवाण करणे तसेच शिक्षण, नोकरी शोधणे यासाठी सक्रीय असतो. तर आता ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी सुध्दा याच माध्यमाचा वापर बिनधास्तपणे तरुणाईपासून ते महिला व अनेक नागरिक करत आहेत. घरातील छोट्या-मोठ्या वापराच्या वस्तू, कपडे, जुन्या वस्तू विकणे, सेलमधील कार, दुचाकी यांच्यासह अन्य साहित्यही खरेदी केले जाते. या सर्वांची जाहिरात विविध कंपनी, वैयक्तिक विक्री करणारे व अन्य व्यवसायिक करत आहेत. याचा फायदा काही हँकर्सनी घेतला आहे. या वेबसाईट किंवा लिंक सोशल माध्यमावर दिवस-रात्र टाकल्या जातात. त्यातच गणपती, महालक्ष्मी व आगामी काळातील सण उत्सव लक्षात घेता टाकल्या जात आहेत. काही जण त्यावर वस्तू पाहून त्याची खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातून काही जणांना वस्तू तर मिळाली नाहीच उलट त्यांचे पैसे मात्र खात्यातून वळती झाले. यानंतर अशा जाहिराती सुध्दा येणे बंद झाले. यामुळे प्रत्येकाने याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.
ऑनलाईन फसवणूक झाल्या मात्र तक्रार नाही
अगदी १०० रुपयापासून ते हजारो रुपयापर्यंतची खरेदी ऑनलाईन पध्दतीने आलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून अनेक जण करतात. यात काहींची फसवणूक होते. मात्र, ते तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. परभणीतही अशा तक्रारी प्राप्त नसल्याचे सायबर सेलचे संतोष शिरसेवाड, संतोष व्यवहारे यांनी सांगितले.
अशी होऊ शकते फसवणूक
७०० रुपयाचे बर्नर पडले २ लाखाला
शहरातील एका महिलेने ऑनलाईन खरेदी करताना ७०० रुपयाचे बर्नर व अन्य साहित्य एकत्रित खरेदी केले. यानंतर त्या महिलेला चारचाकी वाहन लाँटरीत लागल्याचे सांगण्यात आले. याला बळी पडून महिलेने जवळपास ऑनलाईन मागणी केल्यावर २ लाख रुपये चारचाकी वाहनासाठी भरले. मात्र, काही मिळाले तर नाही. परंतू, पैसे देऊन फसवणूक झाली.
टोकणच्या नावाखाली पैशांची मागणी
फेसबुक, इन्स्टाग्राम यावर दररोज हजारो जाहिराती टाकल्या जातात. यात रिंकू कलेक्शन व अन्य चार ते पाच बोगस जाहिराती गणपती व महालक्ष्मी सणाच्या वेळी या माध्यमावर टाकण्यात आल्या होत्या. यात कपडे, खुर्ची, फ्रीज व अन्य साहित्य कमी किमतीत मिळण्यासाठी लिंक दिली होती. तेथे काहींनी खरेदी करण्यासाठी ऑनलाईन व्यवहार केला. मात्र, पैशे वळती झाल्यानंतर जाहिरात बंद करण्यात आली. सध्या चारचाकी व दुचाकी स्वस्तात मिळण्याच्या जाहिराती टाकून ऑनलाईन संपर्क साधून वस्तू पाहण्यासाठी आधी टोकन म्हणून रक्कम घेण्याचे प्रकार वाढले आहेत.
ही घ्या काळजी
- वेबसाईटचे क्रेडेन्शियल तपासून घ्यावेत.
- जाहिरात किंवा वेबसाईट, अँप यांना किती रेटिंग मिळाले, हे तपासावे
- वेबसाईटवर रिव्यूव्ह किती आहेत, कसे आहेत याची माहिती घेतल्यावर मग तेथे क्लिक करावे.
- कँश ऑन डिलिव्हरी हाच पर्याय खरेदी करताना वापरावा
- बँक डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांची माहिती कुठेही टाकू नये.
- खोट्या वेबसाईट बँक खाते, कार्ड नंबर ही माहिती विकत असल्याचे प्रकारही घडले आहेत.