लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे, यासह इतर मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़२०१८ मध्ये पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळालेला नाही़ मागील दोन वर्षामध्ये कर्जमाफी योजनेमुळे पात्र शेतकºयांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे़ माफीमध्ये पात्र असतानाही काही शेतकºयांना वंचित ठेवण्यात आले आहे़ तर काही शेतकºयांना माफीचा लाभ देण्यात आला़ पाथरी तालुक्यातील शेतकºयांना पीक कर्जापासून वंचित ठेवले जात आहे़ त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नवीन पीक कर्जाचे तत्काळ वाटप करावे, २०१८ मध्ये वाटप झालेल्या कर्जाचे पुनर्गठण करावे, कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवलेल्या शेतकºयांनाही पीक कर्जाचे वाटप करावे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या़ येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० वाजेपासून आंदोलनाला प्रारंभ झाला़ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ़ राजन क्षीरसागर यांच्यासह इतरांनी उपस्थित आंदोलकांना मार्गदर्शन करीत प्रशासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली़या आंदोलनात कॉ़ राजन क्षीरसागर, ज्ञानेश्वर काळे, बाजीराव हरकळ, श्रीनिवास वाकणकर, विजयसिंह कोल्हे, नाथा रोडे, सुशिला खंडगाळे, विष्णू ताल्डे, गणेश ताल्डे, संजू धोत्रे, दिगांबर ताल्डे, एकनाथ रोडे, गोविंद मायदळे, सिताराम ताल्डे, मुंजाभाऊ रोडे, माणिक ताल्डे, रमेश धोत्रे, सुभाष कुºहाडे, श्याम मायदळे, भगवान मायदळे, अंगद ताल्डे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
परभणीत भाकपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:27 AM