Bharat Bandh : गंगाखेड येथे इंधन दरवाढी विरोधात गाढव, घोडे, बैलगाड्यासह कॉंग्रेसने काढला धिक्कार मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 02:37 PM2018-09-10T14:37:37+5:302018-09-10T14:39:51+5:30
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
गंगाखेड (परभणी) : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढण्यात आला. यात आंदोलक गाढवं, घोडे, बैलगाड्यांसह सहभागी झाली. मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, माजी आ. घनदाट मामा मित्र मंडळ व मनसेने पाठींबा दिला.
बस स्थानक परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकातून सकाळी अकरा वाजता धिक्कार मोर्चा काढण्यात आला. मोर्चात आंदोलकांनी गाढवं, घोडे, बैलगाड्यांसह सहभागी घेतला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सुरेशराव वरपुडकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. डॉ. मधुसुदन केंद्रे, आ. डॉ मधुसुदन केंद्रे, गोविंद यादव, मनसेचे बालाजी मुंडे आदींनी मोर्चाला संबोधित करत केंद्र व राज्य शासनाविरुध्द संताप व्यक्त केला.
काँग्रेसचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, ऑड. संतोष मुंडे, बालकाका चौधरी, तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनुस, नितीन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माधवराव भोसले, ऑड, सय्यद अकबर, सुनील चौधरी, प्रल्हाद मुरकुटे, लिंबाजीराव देवकते, समाजवादी पार्टी तालुकाध्यक्ष शेख उस्मान, मनसेचे बालाजी मुंडे, धनंजय भेंडेकर आदींचा मोर्चात सहभाग होता. तसेच नगरसेवक चंद्रकांत खंदारे, प्रमोद मस्के, शेख मुस्तफा, रणधीर भालेराव, सुरेश लटपटे, गोपीनाथ भोसले, राजेभाऊ सातपुते, सुशांत चौधरी, माधवराव शिंदे, प्रदीप भोसले, राजू सावंत, योगेश फड, बाबासाहेब मुंडे, बाबुराव गळाकटु, राजु खुरेशी, गोविंद ओझा, साहेबराव भोसले, मुशरफ खान, बालासाहेब टोले, शेख शब्बीर, बंटी कचरे, कार्तिक वाघमारे, दिगंबर निरस, अजीज भाई खान, आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पार्टी आदी पक्ष संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.