सोनपेठ (परभणी ) : येथील तहसील कार्यालयावर भारिप बहूजन महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज दुपारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
आज दुपारी शहिद मुंजाभाऊ तेलभरे चौका येथून मोर्चास सुरूवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छञपती शिवाजी महाराज चौक मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयात पोहचला. यावेळी तहसिलदार यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात गायरान पट्टे गायरान धारकाच्या नावे करावेत, कोरेगाव दंगालीचा मुख्य सुञधार संभाजी भिडे यांना अटक करावी, मागासवर्गीय स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढावे, मराठा, धनगर, व मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आदी मागण्या करण्यात आल्या.
मोर्चामध्ये अनिल डोंगरे, रामेश्वर पंडीत, जिल्हाध्यक्ष प्रवीण कनकुटे, युवक जिल्हा अध्यक्ष दिलीप मोरे, सुधाकर ब्रम्हराक्षे, सुशिल सोनवणे, कचरूबा मुंढे, महिंद्र ठेंगे, रूस्तुम तुपसमुद्रे, श्रीमंत सावंत, धम्मपाल सोनटक्के, आनंद तिरमले, विजय तुपसमुद्रे आदींची उपस्थिती होती.