शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
3
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
4
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
5
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
6
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
7
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
8
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
9
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
10
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
11
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
12
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
14
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
15
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
16
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
17
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
18
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
19
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
20
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू

महादेव जानकरांचा ताफा अडवून दाखविले काळे झेंडे; गावात येण्यापासून रोखले

By ज्ञानेश्वर भाले | Updated: April 10, 2024 12:49 IST

आंदोलक आपल्या भूमिकेला अडून राहिल्याने कुणाचेच काही चालले नाही.

परभणी : पालम तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोगाव येथील मारुती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना मराठा आंदोलकांकडून रोखण्यात आले. यादरम्यान, आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करत जानकरांना विरोध दर्शवला.

मंगळवारी जानकर हे गंगाखेड, पालम शहरातील कार्यकर्त्यांची धावती भेट घेऊन भोगावकडे निघाले हाेते. यादरम्यान, पेठशिवणीच्या महादेव मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्यासोबत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, जिल्हा बँकेचे संचालक गणेशराव रोकडे, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, सभापती गजानन रोकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भैय्या सिरस्कार, उबेदखा पठाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भोगावकडे वाहनांतून निघाल्यानंतर सुरुवातीला पदाधिकाऱ्यांच्या गाड्या, तर पाठीमागील वाहनातून जानकर येत होते. 

सर्वांना मराठा आंदोलकांनी भोगाव फाट्यावरच रोखले. प्रारंभी पदाधिकारी वाहनातून खाली उतरून आंदोलकांना समजावून सांगत होते. परंतु, आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने एकाही पदाधिकाऱ्यांचे काहीच चालले नाही. घोषणाबाजी करून आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून जानकरांना विरोध दर्शवला. प्रचाराऐवजी आपण हनुमान मंदिरात दर्शन घेऊन परत जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना सांगितले. परंतु, आंदोलकांनी कोणाचेही ऐकले नाही. उलट कोणत्याही पक्षाच्या उमेदवारास गावात येऊ देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी यावेळी घेतली.

जानकर १५ मिनिटे वाहनात थांबूनया सर्व घडामोडींदरम्यान महादेव जानकर याठिकाणी जवळपास १५ मिनिटे आपल्या वाहनात थांबून होते. परंतु, आंदोलक आपल्या भूमिकेला अडून राहिल्याने कुणाचेच काही चालले नाही. शेवटी जानकर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मागे वळण्याचे सांगत ते स्वतःहून पदाधिकाऱ्यांसह माघारी परतले. जिल्ह्यात जानकरांबाबत दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे.

टॅग्स :parbhani-pcपरभणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Mahadev Jankarमहादेव जानकर