परभणी: येथील शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविण्यासाठी बसविण्यात आलेले बायोमॅट्रीक मशीन ८ महिन्यांपासून बंद आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे ही यंत्रणा बंद ठेवण्यात आली. आता अनलॉकची प्रक्रिया झाली आहे. खबरदारी म्हणून बायोमॅट्रीक बंद ठेवणे अपेक्षित असले तरी याचा गैरफायदा काही कर्मचारी घेत असून उशिराने कार्यालयात दाखल होत आहे.
ग्रा.पं. निवडणुकीमुळे ग्रामीण भाग ढवळला
परभणी: ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपली आहे. आता अर्ज मागे घेण्याची प्रतीक्षा सुरु आहे. या निवडणुकांमुळे गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात वातावरण ढवळून निघाले आहे. गट-तट आपली बाजू मतदारांपर्यंत मांडत आहेत. अंतिम उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थाने रंग भरणार आहे. सध्या तरी चावड्या चावड्यांवर निवडणुकांची चर्चा झडत आहे.