- लक्ष्मण कच्छवेदैठणा (परभणी) : परभणी -गंगाखेड मार्गावर धावत्या बसने पेट घेतल्याची घटना गुरूवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दैठणा जवळील इंद्रायणी नदी पुलाजवळ घडली. चालक -वाहकाच्या समय सुचकतेमुळे सर्व प्रवाशांना सुखरूप बसमधून उतरविण्यात आले.
गंगाखेड आगारातील बस क्रमांक (एमएच २० बीएल २६९१) सकाळी ९ वाजेच्या सुमारास लातूर गंगाखेड मार्गे परभणी बस गंगाखेडहून परभणीकडे जात होती. याबसमध्ये ३० प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान इंद्रायणी नदी पुलाजवळ बसचालक महादेव मुंडे यांना इंजिनमधून काहीतरी जळाल्याचा वास आला. त्यामुळे त्यांनी बस रस्त्याच्या बाजूला घेत पाहणी करत असताना रेडिएटरमध्ये आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ वाहक चंद्रकांत नोमुलवार यांना माहिती दिली. नोमुलवार यांनी तात्काळ प्रवासी बसमधून बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील लक्ष्मण कच्छवे, आश्विन कच्छवे, सुरज कच्छवे, इस्माईल इनामदार यांनी धाव घेत मिळेत तिथून पाणी घेऊन येत आग आटोक्यात आनण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बस चालकाची कॅबिन खाक झाली. काही वेळाने अग्निशमन बंबचे पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत आग आटोक्यात आणली. दरम्यान या घटनेत चालक वाहकांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. त्यामुळे एसटीचे पुढील नुकसान टळले.
जुन्याच बसवर प्रवासी वाहतुकीचा गाडागंगाखेड आगारातून ५० पेक्षा अधिक बस धावतात. मात्र, जुन्याच बसवर प्रवासी वाहतुकीवर भर दिला जात आहे. त्यामुळे खिळखिळ्या, नादुरूस्त, रस्त्यातच बंद पडणे, पेट घेणे अशा घटना घडत आहेत.