सोनपेठ : येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर सोमवार, १८ जानेवारीपासून कापूस खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती राजेश विटेकर व सचिव अशोक भोसले यांनी दिली. सोनपेठ तालुक्यात यावर्षी १७ हजार हेक्टर जमिनीवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी शेतातील कापूस काढल्यानंतर विक्रीसाठी त्याची कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यानुसार बाजार समितीच्यावतीने क्रमानुसार शेतकऱ्यांना कापूस खरेदीसाठी संदेश पाठविण्यात येत आहेत. २०२०-२१ मधील शासकीय कापूस खरेदी ढगाळ वातावरणामुळे बंद ठेवण्यात आली होती. आता वातावरणात बदल झाल्याने १८ जानेवारीपासून पूर्ववत कापूस खरेदी सुरू होणार असल्याचे सभापती विटेकर यांनी सांगितले. केंद्रावर कापूस घेऊन येण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना मेसेज पाठविण्यात येणार आहेत. मेसेज आलेल्या शेतकऱ्यांनीच विक्रीसाठी कापूस केंद्रावर आणावा, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.
सोनपेठ येथे सोमवारपासून कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:20 AM