पूर्णा (परभणी) : सोलापूर रेल्वे विभागाने घेतलेला ब्लॉक रद्द झाल्याने निजामाबाद - पंढरपूर गाडी 22 जून ते 15 जुलै दरम्यान पूर्ववत धावणार आहे.
सोलापूर विभागात मध्य रेल्वे मध्ये घेण्यात येणाऱ्या इंजिनीरिंग ब्लॉक मुळे तसेच सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्या मुळे या मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. यात नांदेड विभागातून सोलापूर विभागात धावणारी गाडी (51433) निझामाबाद – पंढरपूर सवारी गाडी दि 16 जून ते 07 जुलै तर पंढरपूर निजांमबाद गाडी (51434 ) दि. 15 जून ते 05 जुलै दरम्यान रद्द करण्यात आली होती. परंतु या कालावधीतच पंढरपूर येथे आषाढी एकादशी ची यात्रा असते. यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची यामुळे मोठी गैरसोय होण्याची शक्यता होती. तसेच मराठवाड्यातील भाविकांनी ही गाडी रद्द करू नये अशी मागणी केली होती. यामुळे या कालावधीतील ब्लॉक रद्द करून निझामाबाद-पंढरपूर गाडी दि 22 जून ते 7 जुलै 2019 दरम्यान पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच पंढरपूर - निझामाबाद गाडी दिनांक 15 जून ते 05 जुलै दरम्यान रद्द करण्यात आली होती. हि गाडी दि 23 जून ते 15 जुलै 2019 दरम्यान पंढरपूर ते निझामाबाद अशी धावणार आहे पंढरपूर येथून निझामाबाद ला परत येण्या करिता पंढरपूर ते निझामाबाद हि गाडी उपलब्ध होणार असल्याची माहिती नांदेड रेलव्य विभागाचे जनसंपर्क आधिकारी राजेश शिंदे यांनी दिली