सेलू (परभणी ) : अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला पोलिसांनी आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास पाथरी रोडवर पकडले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सेलू पोलिसात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंठ्याकडून पाथरीकडे टेम्पो (एम.एच.19-झेड-7863 )मधून अवैधरीत्या दहा बैलांची क्रूरपणे वाहतूक करण्यात येत होती. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी टेम्पो अडवून विचारपूस केली असता कुठलाही परवाना चालकाकडे नव्हता. त्यामुळे पोलिसांनी जनावरे व टेम्पो जप्त केला.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी प्रदीप हिरक यांच्या फिर्यादिवरून आरोपी शेख नजीम शेख इस्माईल, मच्छिंद्र मारोती दांगोडे, आसेफ शहा अजीज शहा ( रा.बोरगाव सारोनी, ता.सिल्लोड जि. औरंगाबाद ) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास बीट जमादार संजय साळवे करत आहेत.