परभणी : परभणी-वसमत रस्त्यावर चौपाल सागर परिसरात कार-ट्रक अपघातात 2 जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली.
परभणीहून नांदेडकडे जाणारा ट्रक व नांदेडहून परभणीकडे येणाऱ्या एमएच 22 यु 5577 क्रमांकाच्या कारची शहर परिसरातील चौपाल सागर परिसरात जोराची घडक झाली.
या अपघातात परभणी येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी फसीयोद्दीन शेख व नरहरी कदम या दोघांचा जागीच मृत्यू झाला. चोपल सागर परिसरात अपघाताची चार दिवसांत ही दुसरी घटना आहे.