सेलू (जि.परभणी) : अहमदनगर पोलीस पथकातील १२ जणांच्या तपासातून आरोपीस बेड्या ठोकल्यानंतर त्यांच्या घरून आणि त्यानंतर सेलूतील दोन सराफा व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले चोरीचे दागिने असा एकुण ५५ तोळे मुद्देमाल हस्तगत केला. यात व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी टिम ला ३५ हजार रूपये बक्षीस दिले अशी माहिती अहमदनगर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. तपास अधिकारी पोउपनी अश्विनी मोरे म्हणाले की, २३ आणि २८ ऑक्टोबरला अहमदनगर येथील माणीकनगर परिसरातील डॉ. वृषभ फिरोदीया यांचे घरून ५५ तोळे, घड्याळ असा १२ लाख ५७ हजार चा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. फिर्यादीत ४ महिला नौकर अन् कलर देणारा पेंटर, आईच्या आजाराने घरी कोणी नव्हते अशा स्थितीतील गुन्हा क्लिष्ट असल्याने तपास पुढे सरकत नव्हता, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तापासकामी १२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले. ७० ठिकाणच्या १५० सिसीटीव्ही फुटेच्या तापसणीत ३ सेकंदाच्या फूटेजमुळे दिपक सर्जेराव पवार (रा.राहुरी) यांचे भोवती संशयाची सुई सुरू झाली. त्यातून राहूरी बसस्थानकात कुत्रा घेण्यासाठी आलेला दिपक पवार यास पोलीसांनी ताब्यात घेतले. सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरं देणाऱ्या दिपक पवारने चोरीची कबुली दिली. त्याच्या घरून २९ तोळे सोने दागीणे व ईतर मुद्देमाल हस्तगत केला. उर्वरित सोने दागीने सेलू येथे विक्री केल्याचे आरोपी पवार ने सांगितले.
सेलूतील व्यापाऱ्यांकडून मुद्देमाल केला हस्तगतपोउपनी गजेंद्र इंगळे हे आरोपी दिपक पवारसह कर्मचाऱ्यांना घेऊन शनिवारी सकाळी सेलूत आले. त्यांनी एका व्यापाऱ्यांच्या मुलास चौकशी केली हे सर्वजण सराफा व्यापारी अश्विन शहाणे, संदिप बहिवाल या सराफा यांचेकडे गेले. दोघांनी आरोपीकडून चोरीचे खरेदी केलेले २६ तोळे सोन्याचे दागीने पोलिसांच्या स्वाधीन केले. या दोन्ही व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला. आरोपी दिपक पवार याला ३ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. यातून आणखीन गुन्हे व माहीती मिळेल अशी माहिती दिली.दरम्यान तपासात आरोपी व सराफा व्यापाऱ्यांची मध्यस्थी करणाऱ्यावर कारवाई होईल असेही त्यांनी सांगितले.