सेलू शहरातील पाथरी रस्त्यावर गुुरुवारी रात्री ११.३०च्या सुमारास एका लाल रंगाच्या ट्रक्टरमध्ये १ ब्रास वाळू अवैद्यरित्या वाहतूक केली जात असल्याची बाबत स्थानिक गुन्हा शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणला. त्यानंतर, पोलीस कर्मचारी किशोर सुरेशराव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक मिलिंद अन्सीराम गायकवाड (रा राजवाडी ता सेलू) व ट्रॅक्टर मालक शेख वशीम शेख रफीक ( रजमोहल्ला, सेलू) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटना पाथरी शहरात घडली. गुरुवारी सकाळी ६च्या सुमारास शहरातील बांदरवाडा भागातील कॅनलवरून एमएच ०४ डी ५०९४ क्रमांकाचे बोलेरो पिकअप वाहन अवैद्यरीत्या वाळूची वाहतुक करीत होते. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी सदरील वाहन अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये अर्धा ब्रास वाळू आढळून आली. सदरील वाहन पाथरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी वाहन चालक मुंजाभाऊ बालासाहेब शिंदे (रा.कानसुर ता.पाथरी) याने सदरील वाहन चालकाने ही वाळू ही अवैधरीत्या चोरटी विक्री करण्याच्या उदेशाने वाहनामध्ये भरून घेऊन जात असल्याचे सांगितले. याबाबत पोलीस कर्मचारी मळजीराम अंबादास मुजमुले यांच्या फिर्यादीरवरून वाहनचालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैद्य वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:17 AM