शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
7
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
12
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
13
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
14
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
15
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
16
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही
17
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
18
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
19
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
20
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?

परभणी जिल्ह्याच्या सर्व सीमा नाक्यांवर सीसीटीव्ही बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:09 AM

जिल्ह्याच्या सीमांवरुन अनेक नागरिक प्रवेश करीत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर आता सर्व तपासणी नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या सीमांवरुन अनेक नागरिक प्रवेश करीत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर आता सर्व तपासणी नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्ह्यातील सर्व सीमांवर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. असे असताना अनेक जण या सीमांवरुन पोलिसांना चकमा देऊन तसेच चोरट्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. असाच प्रवेश हिंगोली जिल्ह्यातील तरुणाने पुण्याहून ढालेगावमार्गे जिल्ह्यात केला होता. परभणीत हा तरुण त्याच्या बहिणीकडे आल्यानंतर श्वसनाचा त्रास होत असल्याने केलेल्या तपासणीअंती तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे आतापर्यंत ग्रीनझोनमध्ये असलेला जिल्हा आॅरेंज झोनमध्ये गेला. सीमांवर कडक बंदोबस्त असता तर सदरील तरुणाला तेथेच अडविले गेले असते. या अनुषंगाने ‘लोकमत’ने १७ एप्रिल रोजी एका दिवसात जिल्ह्यात ३३० नागरिकांनी अनधिकृत प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले की, जिल्ह्याच्या सर्व सीमांवर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. तरीही अनेक नागरिक जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे यापुढे या सर्व सीमा नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. तसेच या सीमांवरील बंदोबस्त आणखी कडक केला जाईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.१५ सीमांवर नाकाबंदी पॉर्इंट४जिल्हा सीमांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात जिल्ह्याच्या सीमांवरील १५ ठिकाणी नाकाबंदी पॉर्इंट लावण्यात आले असून या सर्व सीमा सील केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरीही अनेक नागरिक मुंबई, पुणे, औरंगाबाद इ. जिल्ह्यातून जिल्हा हद्दीत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे आता चोरून लपून जिल्ह्यात येणाºया व्यक्तीस त्याचे नातेवाईक किंवा इतरांनी आश्रय देऊन माहिती लपविल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंध अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल. कोणीही बाहेर जिल्ह्यातून येणाºया नागरिकांना आश्रय देऊ नये, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.बाहेर जिल्ह्यातून मजुरांचे लोंढे सुरूच४चारठाणा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली असताना देखील बाहेर जिल्ह्यांतून देवगाव फाटा येथील चेक पोस्ट चुकवून अजूनही मजुरांचे लोंढे जिल्ह्यात दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास मजुराचा एक जथ्था चारठाणा फाटा येथून जात होता. त्यात ७ पुरुष, ४ महिला व २ लहान मुले होती. संबधितांची विचारपूस केली असता सदर मजूर हे हिंगोली जिल्ह्यातील असल्याचे त्यांनी सांगितले. गावाचे नाव मात्र त्यांनी सांगितले नाही. काही जण जालना जिल्ह्यात कामाला आहेत, असे सांगत असले तरी काही जण पुणे येथून आल्याचे सांगत होते. सदर मजूर हे लॉकडाऊनमुळे आडकून पडले होते; परंतु, जवळचे पैसे संपले. त्यातच काम बंद पडल्याने रोजगारा अभावी उपासमार होत असल्याने पायी प्रवास करीत येथून जिंतुर मार्गे गावाकडे जात असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती नाही, असे सांगितले.पथक कॅमेºयाच्या निगराणीतदेवगाव फाटा येथे नाकाबंदी पथक सीसीटीव्ही कॅमेºयाच्या निगराणीत असून या पथकाने दोन दिवसांमध्ये ४२ वाहनांमधील प्रवाशांना जिल्ह्याचा प्रवेश नाकारला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप आलापूरकर व महसूल विभागाचे किरण देशमुख यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्याcctvसीसीटीव्ही