जिल्हाधिकारी गोयल यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आढावा घेतला. कोरोनामुळे यावर्षीही सण- उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सण- उत्सव साजरे करावेत. यावर्षी देखील कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे पीओपी पासून बनविलेल्या मूर्तीं ऐवजी मातीपासून बनविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. तसेच श्री विसर्जनाच्या दिवशी घरीच विसर्जन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांकडून घेणार शपथपत्र : पाटेकर
दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबतचे शपथपत्र विद्यार्थ्यांकडून घेतले जाणार आहे. त्यासाठी सर्व शाळांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहे, असे पाटेकर यांनी सांगितले.