श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी शिवालयात गर्दी होते. तसेच पूर्ण महिनाभर भाविक शिवालयात दर्शन घेऊन महादेवाला अभिषेक करणे, पूजा करणे, विविध जप करणे असे धार्मिक कार्यक्रम होत असतात. मात्र, सध्या कोरोनाने मंदिर बंद असल्याने भाविकांना घरी राहून श्रावणी सोमवार साजरा करावा लागत आहे. केवळ मंदिराच्या कळसाचे दर्शन किंवा मंदिराबाहेर उभे राहून महादेवाच्या पिंडीचे दर्शन मंदिरापर्यंत गेलेल्या भाविकांना घ्यावे लागले. शहरातील पारदेश्वर मंदिर, बेलेश्वर मंदिर, उदेश्वर आणि जबरेश्वर महादेव मंदिर परिसरात दिवसभरात काही भाविकांनी हजेरी लावली होती. जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या अनेक प्राचीन शिवालय मंदिरांमध्येही भाविकांना जाता आले नाही. विविध मंदिर परिसरामध्ये पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला होता. यामुळे पूजेचे साहित्य, बेल, नारळ, प्रसाद यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना मंदिर बंद असल्याने परिसरात दुकान लावता आले नाही.
कळसाचे दर्शन घेऊन श्रावणी सोमवार साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:24 AM