कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गाजावाजा व मिरवणूक न काढता, अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी गंगाखेड शहरातील दिलकश चौक, हटकर गल्ली, गौतमनगर, वेताळ गल्ली आदी ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत अभिवादनाचे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये सकाळी ११:३० वाजता सार्वजनिक शिवजयंती महोत्सव महाराणा प्रताप चौक समितीच्या वतीने शहरातील दिलकश चौक येथे पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, संदीप वाळके, गिरीश सोळंके, गोपीनाथ लव्हाळे, प्रा.विठ्ठल भुसारे, प्रा.संजीव कोळपे, श्रीकांत भोसले, अनिल सातपुते, माधवराव भोसले, सुशांत चौधरी, प्रा.सुरेखा सेंदकर, गोविंद यादव, संगीता चवरे, प्रा.सुभाष ढगे आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत पुष्पवृष्टी करून जय घोषाच्या घोषणा देत शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर, रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब शिंदे, उत्तमराव पवार, संजय तिरवड, गोविंद भांगे, सुरेश काळे, अंगद बंगाळ, विजय रमतापुरे, नंदकुमार भालके, किरण कौसे, चंद्रकांत कदम, साहेबराव चौधरी, गोविंद ठाकूर, गुड्डू कदम, संतोष ढगे, बंडू सौंदडे, नाना सातपुते, सतीश सूर्यवंशी, विजय भिसे, रजत गायकवाड, रावण भालेराव, नागेश डमरे, शंकर पवार, राजकुमार जाधव आदींनी परिश्रम घेतले.
हटकर गल्ली येथे अभिवादन
शहरातील हटकर गल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक राधाकिशन शिंदे, सत्यपाल साळवे, संदीप वाळके, गिरीश सोळंके, मुन्ना शेळके, विलास विभूते, संतोष लबडे, अंकुश मदनवाड आदींची उपस्थिती होती.
गौतमनगर येथे अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वीर भगतसिंग आघाडीच्या वतीने गौतमनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे अर्जून चव्हाण, प्रसाद धापसे, विकास राठोड, वेदांत भिसे, स्वप्निल शिंदे, केदार शिंदे, भागवत सांगुळे, यश भोसले, सीताराम चव्हाण आदी उपस्थित होते.