शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

राज्यमार्गावर सिमेंट व नाल्यांना ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:15 AM

राज्यमार्ग ६१ हा अंबड-आष्टी-पाथरी-पोखर्णी- ताडकळस-पूर्णा- नांदेड या मार्गावरून जातो. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम सर्वेक्षण करून डीपीआर तयार करण्यात ...

राज्यमार्ग ६१ हा अंबड-आष्टी-पाथरी-पोखर्णी- ताडकळस-पूर्णा- नांदेड या मार्गावरून जातो. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम सर्वेक्षण करून डीपीआर तयार करण्यात आला होता. पाथरी तालुक्यात या रस्त्याची लांबी जवळपास ५७ कि.मी.ची आहे. सध्या तालुक्यातील हद्दीत अष्टीकडून येणाऱ्या रस्त्यावर वेगाने काम सुरू आहे. पाथरी-पोखर्णीपर्यंतचे काम जवळपास पहिल्या टप्प्यात पूर्ण होत आहे. आष्टी-पाथरी रस्त्याजवळ हादगाव बुद्रूक गाव परिसरात सिमेंट रस्ता व रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाला करणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित विभागाने डीपीआर तयार करताना या दोन्ही घटकांचा समावेश न करता डांबरीकरणाचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे हादगाव बुद्रूक ग्रामस्थांना भविष्यात दळणवळणाच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

ग्रामस्थांची सा. बां. कडे धाव

हादगाव बुद्रूकच्या गावठाण परिसरातील रस्त्यावर दोन वसाहती आहेत. या ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता आणि नालीचे काम करणे आवश्यक आहे. यासाठी सा. बां. बांधकाममंत्री अशोक चव्हाण व सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे जि.प.च्या सदस्य भावनाताई नखाते व ग्रामस्थांनी लेखी तक्रार केली आहे. तसेच हादगाव बुद्रूक ग्रामपंचायतीने ७ ऑगस्ट २०२० रोजी ठराव घेऊन या ठिकाणी सिमेंट काँक्रीट व नालीचे काम करण्याची मागणी केली आहे.