परभणी शहरात पाथरी रोड येथे भाजीपाल्याचे बीट मार्केट आहे. यासह बाजारातील कडबी मंडी, क्रांती चौक येथे व काळीकमान परिसरात ग्रामीण भागातील भाजी विक्रेते बसतात. शहरात जवळपास दोनशेहून अधिक भाजी विक्रेते आहेत. सध्या जिल्ह्यात ८ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकवर झाला आहे. यामुळे आवक कमी झाली आणि आता दरवाढ झाली आहे.
भाजीपाल्याचे भाव (प्रति किलो)
- बाजारातील भाव -घराजवळ
चक्री ४०, ५०
भोपळा ४० ५०
गवार ६० ८०
कारले ४० ५०
वांगे ४० ५०
टमाटे २० २५
बटाटे २० २५
शिमला ५० ६०
पत्ताकोबी २० २५
फुलकोबी ४० ५०
दोडके ६० ६०
मिरची ३० ३०
कांदा २० २५
मागणी वाढली
पक्षामुळे घरोघरी पितृपक्षासाठी भोपळा व चक्रीची भाजी केली जाते. यामुळे चक्रीची मागणी वाढली आहे. यातच पावसाने भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी दरवाढ झाली आहे.
व्यापारी काय म्हणतात
पावसामुळे झाडांना फळ लागणे कठीण होते. यामुळे फळ काढण्यास अडचणी येतात. सध्या भाजीपाल्याचे दर वाढले, मात्र ५० टक्क्यांहून अधिक आवक घटली आहे. - गजानन वाघमारे, भाजीविक्रेते.
भाजीपाला मोठ्या प्रमाणावर दाखल होतो तेव्हा दर कमी असतात. मात्र, सध्या सणवार आणि पावसाच्या परिणामामुळे दर वाढले आहेत. यामुळे ग्राहक घासघीस करतात. - एच.एस. वाघमारे, भाजी विक्रेते
अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार?
दररोज लागणाऱ्या भाजीपाल्यासाठी बाजारात जाणे परवडत नाही. यामुळे घराजवळ भाजीपाला खरेदी करावा लागतो. यात पैसे जास्त लागत असले तरी विकत घ्यावी लागते. अर्धा किलो व पाव किलो भाजी घेण्यास बाजारात जाणे परवडत नाही. - विलास ठेंग
मागील काही महिन्यांपासून नेहमीच भाजीपाल्याचे दर वाढत आहे. यामुळे गृहिणांचे घरोघरी बजेट कोलमडले आहे. एक हजार ते १५०० रुपये केवळ भाजीसाठी लागत आहे. - श्वेता पाटील