शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

बाल वैैज्ञानिकांचा शेती, पर्यावरणपूरक प्रयोगांवर भर

By admin | Published: September 30, 2016 1:09 AM

उस्मानाबाद : येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये आयोजित इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड जिल्हास्तरीय प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी शेती उपयोगी, पर्यावरणपूरक,

उस्मानाबाद : येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये आयोजित इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड जिल्हास्तरीय प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी शेती उपयोगी, पर्यावरणपूरक, सौर ऊर्जेचा वापर आदी विविध विषयावरील प्रकल्पांचे सादरीकरण केले़ विशेषत: कमी खर्चात चांगले प्रयोग तयार करून त्याचा दैैनंदिन जीवनात होणारा वापर, ही विद्यार्थ्यांनी केलेली संकल्पना आणि त्यातून सादर झालेले प्रयोग अनेकांचे लक्ष वेधून घेत होते़भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व जिल्हा परिषदेच्या वतीने येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये २९ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर या कालावधीत जिल्हास्तरीय इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे़ याचे उद्घाटन माजी आमदार सि. ना. आलुरे गुरूजी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, सभापती हरिष डावरे, जि.प.चे माजी अध्यक्ष एस. एल. पाटील, अनंत उंबरे, शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, संजय राठोड, उपशिक्षणाधिकारी शिवदास नलावडे, रमेश जोशी, रोहिणी कुंभार यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना आलुरे गुरूजी म्हणाले की, विद्यार्थ्यांतील गुण शिक्षकांनी जाणून घेतले तर निश्चितपणे यश मिळू शकते. विद्यार्थ्यांनी स्वत:ला कमी लेखू नये, असे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी बाळगल्यास यश सहज संपादन करू शकतात असे सांगितले. यावेळी इतर मान्यवरांचीही भाषणे झाली.प्रदर्शनादरम्यान, तेरखेडा येथील गणेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘सोलार वॉटर हिटर’ हा टाकाऊ बाटल्या, काच आणि वाळूपासून निर्मित केलेल्या प्रयोगाचे सादरीकरण केले होते़ सौर ऊर्जेचा वापर करून पाणी गरम करण्याची संकल्पना यातून मांडण्यात आली होती़ जुनोनी येथील पांडुरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऊर्जाबचतीचा सादर केलेला प्रयोगही अनेकांना आकर्षित करून गेला़ तर कुक्कडगाव येथील कल्याणी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वायूप्रदुषण रोखण्यासाठीचा प्रयोग सादर केला आहे़ बोरगाव (दु़) येथील राजीव गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जल विद्युत ऊर्जा केंद्र प्रयोग सादर केला़ पडत्या पाण्याचा वापर करून वीजनिर्मिती करण्याचा हा प्रयोग आहे़ महाड येथील पूल दुर्घटनेचाही प्रभाव या प्रदर्शनावर दिसून आला़ एखादा पूल खराब झाला किंवा पडला तर चालकांना कशी सूचना मिळेल ? याचा विचार करून अनेक शाळांनी पूलाच्या संरक्षणाबाबत प्रयोग सादर केले होते़ यात कुक्कडगाव येथील कल्याणी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खराब पुलाबाबत तर आरळी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पूर सूचकाबाबत प्रयोग सादर केले आहेत़ (प्रतिनिधी)