वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली - ३६,५६१
दुसरी - ३७,८२१
तिसरी - ३६,९४७
चौथी - ३६,४७५
पालकांनी घरातच घ्यावी शाळा
मुलांना बळजबरी अभ्यासाला बसविण्यापेक्षा त्यांच्या आवडीच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावे. पहिलीच्या मुलांना बडबडगीते, पाढे म्हणून घेणे आणि अक्षर ओळख करून घेणे, या गोष्टी सहजरित्या पालकांनी दिवसभरात अर्धा ते एक तास वेल काढून शिकवाव्यात. तसेच शाळा स्तरावर पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणारी मोफत पुस्तके घेऊन त्यांचा अभ्यास घरी करून घ्यावा. रांगोळीतून तसेच पिठावर रेघोट्या करून बालकांना अक्षर ओळख करून द्यावी. या पद्धतीने शाळा सुरू होईपर्यंत पालकांनी प्रयत्न करावेत. - स्मिता ढगे, शिक्षिका.
मुलांना अक्षर ओळख होईना
ऑनलाईन अभ्यास करताना मुले केवळ शिक्षक सांगत असलेल्या बाबी एकूण घेत आहेत. त्यांना शाळेत जसे फळ्यावर अक्षर, पाढे, चित्र ओळख होते. या सर्व बाबी पुस्तकात असल्या तरी त्या पालकांनी बालकांना स्वत: सांगाव्यात. तसेच त्याचे पाठांतर करण्यासाठी प्रयत्न करावेत.
अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक
- खेळाकडे लक्ष जास्त दिले असल्याने बालकांचे अभ्यासाकडे मन वळत नाही.
- ऑनलाईन क्लास केला म्हणजे शिक्षण झाले असा समज बालकांचा झाला आहे.
- दररोजचा गृहपाठ नसल्याने अभ्यास करण्यास टाळाटाळ
- मोबाईलमुळे जास्त वेळ वाय जात आहे.