पूर्णा (परभणी ): नांदेड मार्गावर असलेल्या चुडावा येथे महाराष्ट्र ग्रामीन बँकेतून दोन फाईल व संगणक सीपीयू चोरीस गेल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे.
चुडावा येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेतचोरी झाल्याचे आज पहाटे उघडकीस आले आहे. बँकेच्या मुख्य द्वाराचे शटर वाकवून चोरट्याने आत प्रवेश केला. बँकेच्या व्यवस्थापकांनी याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. यानंतर सपोनी कर्डक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक पाहणीत बँकेतील दोन फाईल व एक संगणक सीपीयू चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले आहे. या वेळी घटना स्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी ए जी खान, यांच्या सह जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे पो नि संजय हिबरे यांनी भेट दिली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. याबाबत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.