लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील महिनाभरापासून शहर परिसरात तापाची साथ पसरली असून, प्रत्येक घरात तापाचा एखादा तरी रुग्ण आढळत आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात संसर्गजन्य आजाराचे प्रतिबंधात्मक उपाय राबविले जात नसल्याने रुग्णांमध्ये वाढ होत आहे़शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून थंडी, ताप, खोकला यासारखे साथीचे आजार वाढले आहेत़ येथील जिल्हा रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयामध्ये अनेक रुग्ण उपचार घेत आहेत़ दररोज सकाळपासूनच खाजगी दवाखान्यांसह जिल्हा रुग्णालयातही रुग्णांची गर्दी दिसून येत आहे़ विशेष म्हणजे तापाच्या साथीमध्ये अंग दुखणे, अंगावर पुरळ येणे, सांधे दुखणे, हुडहुडी भरणे अशी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येत आहेत़ येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ आॅक्टोबर रोजी एकूण २८ रुग्ण तापीच्या संसर्गजन्य आजाराने उपचार घेत असल्याची माहिती मिळाली़ याशिवाय दररोज ओपीडीतून औषधोपचार करून घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे़ डेंग्यू सदृश्य या प्रकारात हा ताप मोडत असून, शहरी भागात तापाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ तब्बल महिनाभरापासून ही साथ पसरली असून, साथ प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याने साथ आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहो़ विशेष म्हणजे युवकांमध्ये साथीची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे़तापाचे वेगवेगळे प्रकार असले तरी यावेळेस रुग्णांना तापाची लागण झाल्यानंतर सांधेदुखीचा त्रास होत आहे़ डेंग्यू सदृश्य स्वरुपाचा हा ताप असून, काही भागात चिकुनगुनियासदृश्य आजाराची लक्षणे दिसू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ तेव्हा आरोग्य विभागाने साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी पावले उचलावीत़ तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करावे, तसेच ज्या भागात साथीचे रुग्ण आढळले त्या ठिकाणी धूर फवारणी व इतर प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी होत आहे़१५ ते ३५ वयोगटातच तापाची लक्षणेच्एक महिन्यापासून शहरात डेंग्यू सदृश्य तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे़ आर्थोमिक्सा व्हायरस या प्रवर्गात ही साथ मोडते़ सांधे दुखणे, अंगावर पुरळ येणे अशी या तापाची लक्षणे आहेत़च्विशेष म्हणजे १५ ते ३५ वयोगटातील युवकांनाच या साथीची अधिक प्रमाणात लागण होत असल्याचे दिसत आहे़ डासांच्या माध्यमातून साथ आजार पसरत असल्याचे येथील डॉ़ रामेश्वर नाईक यांनी सांगितले़च्शहरात डेंग्यू सदृश्य तापाबरोबरच घोड्यागौर या साथीचेही रुग्ण आढळत आहेत़ यावर्षी पाऊसकाळ लांबला़ वातावरणातील बदल झाल्याने साथीचे आजार वाढले आहेत़ मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक महिना उशिराने साथीचा फैलाव झाल्याचेही डॉ़ नाईक यांनी सांगितले़
परभणी शहरात तापाच्या साथीने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:51 PM