लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मनपाने दर बुधवारी स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, २२ नोव्हेंबर रोजी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत मोहिमेचा प्रारंभ झाला़सकाळी ८़३० वाजण्याच्या सुमारास नीरज हॉटेल ते बसस्थानक, नीरज हॉटेल ते गर्ल्स हायस्कूल या भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़ व्यापारी, नागरिकांनी कचरा नालीत न टाकता घंटागाडीत टाकावा, व्यापाºयांनी दुकानात डस्टबीन ठेवावी, असे आवाहन अनासपुरे यांनी यावेळी केले़ यावेळी आयुक्त राहुल रेखावार, उपायुक्त विद्या गायकवाड, नगरसेवक चंद्रकांत शिंदे, रितेश झांबड, सहाय्यक आयुक्त विजया घाडगे, डॉ़ राजगोपाल कालानी, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांची उपस्थिती होती़
मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:30 AM