लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव २३ जानेवारी रोजी परभणी जिल्ह्याच्या दौºयावर येत असून, या दौºयाच्या पार्श्वभूमीवर येथील रेल्वे स्थानकावर सोमवारी स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे करण्यात आली़महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांचा दौरा निश्चित झाला असून, या दौºयात ते जिल्ह्यातील गंगाखेड, परभणी आणि पूर्णा या तीन रेल्वे स्थानकांची पाहणी करणार आहेत़ विविध विभागांना भेटी देऊन विकास कामांचा आढावाही घेणार आहेत़ या दौºयाच्या पार्श्वभूमीवर येथील रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळपासून स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली़ स्थानकाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे़ ठिक ठिकाणी सूचना फलके लावली आहेत़ तसेच स्थानकाच्या इमारतीला रंगरंगोटी करण्याचे कामही करण्यात आले़ मुख्य प्रवेशद्वारासमोर वेळ दर्शविणारा मोठा डिजीटल बोर्ड नव्याने लावण्यात आला आहे़ स्थानकातील इलेक्ट्रीशियन विभाग, जनरेटर विभाग आदी विभागांमध्ये रंगरंगोटी आणि डागडुजीची कामेही करण्यात आली़ रेल्वे स्थानकात दिवसभर स्वच्छता अभियान राबविण्यात आले़ ठिक ठिकाणी डस्टबीन ठेवल्या असल्याचेही दिसून आले़ रेल्वे स्थानकाच्या परिसरात सुशोभिकरण करण्यासाठी जागा निश्चित केली आहे़ या जागेत सोमवारी झाडे लावून हा परिसर सुशोभित करण्यात आला़ तसेच स्थानकाची रंगरंगोटीही करण्यात आली़ंदादºयावरून दिला स्वच्छतेचा संदेश४देशभरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे़ याच अनुषंगाने परभणी रेल्वे स्थानकावरील दादºयांचे सुशोभिकरण करीत स्वच्छतेचे संदेश प्रत्येक पायºयांवरून देण्यात आले आहेत़४त्यामुळे या माध्यमातून स्वच्छतेचा प्रसार केला जात आहे़ त्याचप्रमाणे या दादºयावर आकर्षक पद्धतीने राष्ट्रीय प्राणी वाघ आणि राष्ट्रीय पक्षी मोर असे दोन चित्र लावण्यात आल्याने दादºयाच्या सुशोभिकरणात भर पडली आहे़वॉटर व्हेंडींग मशीन बसविली४परभणी रेल्वे स्थानकावर नव्यानेच वॉटर व्हेंडींग मशीन बसविण्यात आली आहे़ ही मशीन अद्याप कार्यान्वित झाली नाही़ महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांच्या हस्ते या मशीनचे उद्घाटन होईल़ त्यानंतर ही मशीन प्रवाशांसाठी खुली होणार आहे़ या मशीनद्वारे प्रवाशांना पाच रुपयांमध्ये शुद्ध पाणी मिळणार आहे़परभणी येथे पाऊण तासांचा दौरादमरेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव हे तपासणीच्या संदर्भाने हा दौरा करीत आहेत़ परळी येथून सकाळी ९़५० वाजता त्यांचे गंगाखेड रेल्वेस्थानकावर आगमन होईल़ या स्थानकावर ५० मिनिटे ते थांबणार आहेत़ या ठिकाणी रेल्वे स्थानक, रेल्वे कॉलनी, गोदावरी नदीवरील रेल्वेचा पूल, गँग आणि नागरिक व माध्यमांशी असलेले संबंध या विषयी तपासणी करणार आहेत़ त्यानंतर सकाळी ११़०५ वाजता त्यांचे परभणी रेल्वे स्थानकावर आगमन होईल़ ४५ मिनिटे ते स्थानकाची तपासणी करणार आहेत़ त्यात रेल्वे स्टेशन, प्रवाशांच्या सुविधा, सीसीटीव्ही रुम, विश्रांती कक्ष, गुडस् शेड या विभागांची तपासणी करणार आहेत़ तसेच परभणी ते मिरखेल या मार्गावरील रेल्वेच्या गतीचीही पाहणी यादव करणार आहेत़
परभणी रेल्वेस्थानकवर सुशोभिकरणासह स्वच्छतेची कामे : महाव्यवस्थापकांच्या दौºयाची जोरदार तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:20 AM