शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
3
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
4
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
5
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
6
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
7
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
8
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
9
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
10
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
11
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
12
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
13
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
15
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
16
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
17
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
18
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
19
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
20
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार

परभणीतील ५ आमदारांचे प्रत्येकी पाच कोटी; आचारसंहितेच्या धसक्याने शंभर टक्के निधी खर्च

By मारोती जुंबडे | Published: March 01, 2024 5:15 PM

विकास कामांना लागणार हातभार; नाल्यांसह रस्ते होणार चकाचक

परभणी: आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ५ आमदारांना प्रत्येकी ५ कोटी रुपये याप्रमाणे २५ कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी मिळाला. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसहिता मार्च महिन्याच्या पूर्वधार्थ लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी ही आपल्याला मिळालेला निधी विकास कामासाठी वेळेत खर्च व्हावा, यासाठी या पाचही आमदारांनी मुदतपूर्व १०० टक्के निधी खर्च केल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाकडून देण्यात आली.

आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत मतदार संघातील विविध विकासकामे करण्यासाठी विधानसभा सदस्य असलेल्या आमदारांना शासनाकडून दरवर्षी निधी दिला जातो. गतवर्षापर्यंत आमदारांना प्रत्येकी ४ कोटी निधी मिळत होता; परंतु २८ जून २०२२ च्या शासननिर्णयानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून या विकासनिधीत आणखी १ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आमदारांचा विकासनिधी ५ कोटी रुपयांचा करण्यात आला. या निधीतून लोकप्रतिनिधींनी रस्ते, सभागृह याच्यासह नळ योजना आरोग्यसह शाळांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी गाव पातळीवर उपलब्ध करून दिला. 

विशेष म्हणजे, यंदा मार्च महिन्याच्या पूर्वधार्थ लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल अशी कुण-कुण जानेवारी महिन्यापासूनच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना होती. त्यानुसार आपल्याला मिळालेला निधी जिल्ह्यातील विकास कामांवर वेळेत खर्च व्हावा, या उद्देशाने लोकप्रतिनिधीस जिल्हा नियोजन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पावले उचलली. लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या. आ. मेघना बोर्डीकर, आ. डॉ. राहुल पाटील, आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. सुरेश वरपूडकर यांनी राज्य शासनाकडून मिळालेल्या पाच कोटी रुपयांच्या निधी विविध विकास कामांसाठी खर्च केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे लोकप्रतिनिधीने आचारसंहितेचा धसका घेत आपल्याला मिळालेला शंभर टक्के निधी जिल्ह्यातील विकास कामांवर खर्च केला आहे.

२ खासदारांकडूनही १०० टक्के निधी खर्चआमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाच आमदारांना प्रत्येकी पाच कोटी याप्रमाणे पंचवीस कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी मिळाला. त्यानुसार त्यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी खर्चही केला. दुसरीकडे जिल्ह्यातून दोन खासदार परभणीचे नेतृत्व करतात. यांनाही जिल्ह्यातील विकास कामांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यानुसार खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान यांनीही आपल्याला मिळालेला निधी शंभर टक्के खर्च केल्याची माहिती नियोजन विभागाकडून मिळाली.

लोकप्रतिनिधी             मिळालेला निधी            खर्चआ. डॉ. राहुल पाटील             ५ कोटी             १०० टक्केआ. मेघना बोर्डीकर             ५ कोटी             १०० टक्केआ. डॉ. रत्नाकर गुट्टे            ५ कोटी             १०० टक्केआ. सुरेश वरपुडकर            ५ कोटी             १०० टक्केआ. बाबाजानी दुर्राणी          ५ कोटी             १०० टक्के

९१ टक्के निधी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकणार?जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन वार्षिक योजनेअंतर्गत २०२३-२४ साठी २७३ कोटी ५० लाख रुपयांच्या मर्यादा ठरवून देण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील नागरिक क्षेत्रातील सेवा सुविधांसाठी राज्य शासनाने विशेष निधी मंजूर केला. यामध्ये १६ कोटी ५० लाख रुपये परभणीच्या वाट्याला आले. परिणामी, जिल्हा वार्षिक योजना आता २९० कोटींवर पोहोचली. मात्र आतापर्यंत केवळ ९ टक्के निधी खर्च करण्यात आला. उर्वरित ९१ टक्के निधी खर्च करणे बाकी आहे. दुसरीकडे हा निधी खर्च करण्यासाठी केवळ ३० दिवसांची मुदत बाकी आहे. दुसरीकडे आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने हा निधी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकतो की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकparabhaniपरभणी