सुशोभिकरणाअभावी चौकांची दुरवस्था
परभणी : शहरातील चौक सुशोभिकरणाचे काम ठप्प आहे. मनपा प्रशासनाने या संदर्भात कोणताही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे ग्रँड कॉर्नर, अपना कॉर्नर, जुना मोंढा, गव्हाणे चौक या चौकांची दुरवस्था झाली आहे. चौकांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. तसेच चौकांची दुरवस्था झाली आहे. मनपाने याकडे लक्ष देऊन चौकांचे सुशोभिकरण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
जलवाहिनी टाकण्याचे काम सुरूच
परभणी : शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. अनेक भागांत खोदकाम केले जात आहे. मागील सहा महिन्यांपासून शहरांतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून, या कामास गती मिळत नसल्याने वारंवार रस्ते फोडले जात आहेत. मनपाने ही कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.