परभणी : जिल्ह्यात थंडीची लाट परसली असून गुरुवारी तापमानात अल्पशी वाढ होऊन पारा ६.५ अंशावर स्थिरावला.
आठवडाभरापासून जिल्ह्यामध्ये थंडीचे प्रमाण वाढले आहे. यावर्षीच्या हिवाळ्याच्या अखेरपर्यंत थंडी वाढत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. साथीचे आजार बळावत असून जनजीवनही विस्कळीत होत आहे. बुधवारी जिल्ह्याचे तापमान ४ अंश नोंद झाले होते. गुरुवारी मात्र या तापमानात अल्पशी वाढ झाली असून ६.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने दिली.
दरम्यान, थंडीमुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. सायंकाळच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण होत आहे. ग्रामीण भागामध्ये शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जात आहे.