कच्चा रस्त्यामुळे अडचण
सेलू: शहरातील गणेश नगर, शंभु नगर आदी नवीन वसाहतीत पक्के रस्ते नसल्याने वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळ्यात चिखल तुडवत चालावे लागते. पक्के रस्ते करण्याची मागणी आहे.
मंगलकार्य हाऊसफुल्ल
सेलू : बुधवारी लग्न तिथी मोठी असल्याने शहरातील मंगलकार्य हाऊसफुल्ल होते. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूकीची वर्दळ होती. त्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहनाची कोंडी झाली होती. कोरोनाचे नियमाची पायमल्ली होत आहे.
प्रवाशांची गैरसोय
सेलू : येथील बस स्थानकातील आसन व्यवस्था तुटली आहे. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहवे लागत आहे. वृद्ध प्रवाशांना जमीनीवर बसावे लागत आहे. एसटी महामंडळाने नवीन आसन व्यवस्था बसवावी अशी मागणी होत आहे.
उघडया डिपी धोकादायक
सेलू : शहरातील वीजेच्या रोहित्र जवळील डीपीला दरवाजा नसल्याने धोकादायक बनले आहे. त्यामुळे अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे. महावितरणने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
मोकाट जनावरे रस्त्यावर
सेलू : शहरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे वाहतूकिची कोंडी होत असून पशुपालक जनावरे मोकाट सोडून देत आहेत. पालिकेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
प्रचार साहित्याची जुळवाजुळव
सेलू : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार सुरु झाला. प्रचार साहित्याची जुळवाजुळव केली जात असून प्रिटींग प्रेसवर गर्दी होत आहे.