मानवत (जि.परभणी) : प्रशिक्षणाचे मानधन काढण्यासाठी पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकऱ्याला ४ हजार रुपयाची लाच कमिशन स्वरूपात घेतल्याप्रकारणी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री कारवाई केली. याप्रकरणी २८ मार्चल पहाटे 2:30 वाजता गुन्हा दाखल करून दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केली.
मानवत पंचायत समिती कार्यालयात प्रशिक्षणार्थींना मास्टर ट्रेनर यांनी १७ ते २१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीदरम्यान राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ‘आमचा गाव , आमचा विकास ‘ उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिलेले होते. तक्रारदार ट्रेनर यांचे कामाचे मानधन१४ हजार रूपये होते. हे मानधन विस्तार अधिकारी संदीप पवार यांच्या खाजगी बँक अकाऊंटवर जमा झाले होते. मानधन घेण्यासाठी तक्रारदार यांनी प्रभारी गटविकास अधिकारी स्वप्निल पवार व पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संदीप पवार यांना वारंवार प्रत्यक्ष भेटून मागणी केली. तसेच तक्रारदार यांनी वरिष्ठांना लेखी तक्रार करून सुद्धा त्यांना मानधनाची रक्कम देण्यात आलेली नव्हती. यातील विस्तार अधिकारी संदीप पवार यांनी ट्रेनर यान तक्रारदार ट्रेनर यांना १४ हजाराचा देय धनादेश न देता १० हजार रू रक्कमेचा स्वतः च्या वैयक्तिक बँक खात्याचा चेक देऊन ४,००० रू.कमिशन स्वरूपात लाचेची रक्कम स्विकारली. याप्रकरणी अविनाश मगर यांच्या तक्रारीवरून प्रभारी गट विकास अधिकारी स्वप्निल पवार विस्तार अधिकारी संदीप पवार यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे, पोनि सदानंद वाघमारे, पोनि बसवेश्वर जकीकोरे, पोह चंद्रशेखर निलपत्रेवार, पोह मिलिंद हनुमंते, पोशि अतुल कदम, पोशि शेख मुख्तार, पोशि शेख झिब्राईल, चालक पोह जनार्धन कदम, अँटी करप्शन ब्यूरो टिम परभणी यांनी केली.